You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील न्यायालयाच्या नुतन इमारतीच्या कोनशिला समारंभ संपन्न

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील न्यायालयाच्या नुतन इमारतीच्या कोनशिला समारंभ संपन्न

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील न्यायालयाच्या नुतन इमारतीच्या कोनशिला समारंभ संपन्न

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात प्रगती करणारा जिल्हा आहे. देश विकसित होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. आता मोदींचा भारत म्हणून ओळख आहे. अशा भारतात महाराष्ट्र आणि कोकण आहे. पर्यटनातुन जिल्ह्याचा विकास होण्यासाठी प्रयत्न आहेत. देश महासत्ता व्हावा यासाठी सर्वांनी आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक काम करावे असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील न्यायालयाच्या नुतन इमारतीच्या कोनशिला समारंभावेळी आवाहन केले.

कुडाळ तहसीलदार नजिकच्या जागेत कनिष्ठ स्तर न्यायालयात सन कुडाळ येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर, पारिजात पांडे, खा.विनायक राऊत, जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड मुख्य न्याय दंडाधिकारी दिवाणी न्यायाधीश अश्विनी बाचुळकर, मुंबई बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड संग्राम देसाई, मुंबई न्यायालयाचे रजिस्टार आर. एन. जोशी, एस. एस. गोसावी, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कार्यकारी अभियंता महेंद्र केणी आदीसह जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष परिमल नाईक, एड.राजश्री नाईक, उपाध्यक्ष प्रज्ञा पाटील,प्रांताधिकारी विशाल खत्री, ऐश्वर्या काळुसे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड.अविनाश परब, सचिव अॅड.महेश शिंपूकडे, ऍड अजित भणगे माजी आमदार राजन तेली रणजित देसाई न्यायमूर्ती रत्नागिरी श्री गोसावी ऍड प्रशांत देसाई ऍड विलास पाटणे ए डी तिरके आदी सह न्यायिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा