You are currently viewing राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आजही मजबूत – कणकवली शहराध्यक्ष महेश तेली

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आजही मजबूत – कणकवली शहराध्यक्ष महेश तेली

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आजही मजबूत – कणकवली शहराध्यक्ष
महेश तेली

कणकवली

काँग्रेसपक्ष ही एक जुनी विचारधारा व संघटना आहे व आजही ही संघटना देशात अथवा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळागाळात पोचलेली आहे.
कणकवली तालुका किंव्हा कणकवली शहरातील काही काँग्रेस पदाधिकारी इतर पक्षांत जात आहेत अशी सोशल मीडियातून बातमी पसरवली जात आहे.
त्यामुळे काही पदाधिकारी इतर पक्षांत काही पदाच्या अमिषा पोटी गेले तरी काँग्रेस पक्षाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणार नाही.
आज जे श्री.महानंद चव्हाण ह्यांनी जो काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केला अशी बातमी सोशल मीडिया मार्फत पसरवली जात आहे ती अक्षरशः थट्टा आहे ते नोकरीत असल्याने ते काँग्रेस पक्षात कधीच नव्हते व आता सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचा पूर्वी सुद्धा व आता सुद्धा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही.
जे कडवट असंख्य निष्ठावंत काँग्रेस प्रेमी तसेच काँग्रेस कार्यकर्ते व काँग्रेस पदाधिकारी हे काँग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ सदेव असतील असे कणकवली तालुका अध्यक्ष, प्रदीप मांजरेकर व कणकवली शहराध्यक्ष महेश तेली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा