You are currently viewing शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा

सिंधुदुर्ग जिल्ह्या काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे

तिन काळे कृषी कायदे मागे घ्यावेत व शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करावा यासाठी संपूर्ण भारतात शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर 2021 रोजी भारत बंद पुकारला आहे या भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्ह्या काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
गेल्या नऊ महिन्यापासून देशातील शेतकरी केंद्र सरकारने केलेले तिन कृषी कायदे रद्द करावेत आणि शेतीमालाला हमी भाव मिळण्याचा कायदा करावा यासाठी दिल्लीच्या सीमेवर ठाणमांडून बसले आहेत गेल्या नऊ महिन्यात सहाशे शेतकऱ्यांचा मृत्यू दिल्लीच्या सीमेवर झाला परंतू केंद्रातील मोदी सरकारच्या ह्रदयाला पाझर फुटलेला नाही. हे केंद्रातील मोदी सरकार शेतक-याच्यांच्या या मागण्यांबाबत विचार करायला तयार नाही. हे केंद्रातील मोदी सरकारने केलेले तिन काळ्या कृषी कायद्यांमुळे या देशातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे हे कायदे केंद्र सरकारने मोदींच्या काही उद्योगपती मित्राना फायदा करून देण्यासाठी केले आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि यात तथ्य ही दिसून येते कारण हे कृषी कायदे पारित होण्या पुर्वीच या मोदींच्या मित्र असलेल्या उद्योगपतीनी शेतमालाची साठवणूक करण्यासाठी हजारो एकर जमीन घेऊन मोठमोठी गोदाम बांधली आहेत. या कायद्यांमुळे देशातील शेतकरी हा पुन्हा एकदा गुलाम बनणार आहे. स्वातंत्र्यानंतर शेतमजूराला हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी त्यावेळी केंद्रत सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारने कुळ कायदा आणून कसेल त्याची जमीन या न्यायाने शेतमजूराना, भूमिहीनाना जमीन मालक बनवले. आता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा हे काळे कायदे आणून शेतकऱ्यांना भूमिहीन बनवू पाहात आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत बंदला संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा