You are currently viewing सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी !!

सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी !!

पशुसंवर्धन विभागात 3 हजार पदांची मेगाभरती…

 

राज्यसरकारच्या पशुसंवर्धन विभागात मेगाभरती निघणार असल्याने सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. या संदर्भातील माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागात सुमारे ३ हजार पदांसाठी मेगा भरती निघणार आहे. यामध्ये पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील जागाही भरल्या जाणार आहेत, अशी माहिती सुनील केदार यांनी दिली आहे. या भरती प्रक्रियेची माहिती काही दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारच्या अनेक विभागातील भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेल्या आहेत. परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने विविध विभागांमधील भरती प्रक्रियांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याबाबत अधिसूचना लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =