You are currently viewing सावंतवाडीत आज रंगणार ‘भाजपा श्री भव्य बॉडीबिल्डिंग’ स्पर्धेचा थरार!
Oplus_16908288

सावंतवाडीत आज रंगणार ‘भाजपा श्री भव्य बॉडीबिल्डिंग’ स्पर्धेचा थरार!

भाजपा युवा मोर्चाच्या पुढाकारातून भव्य आयोजन; विशालजी परब यांच्या हस्ते होणार उद्घाटन, शरीरसौष्ठवपटूंच्या दमदार प्रदर्शनासाठी सावंतवाडीकर उत्सुक

सावंतवाडी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेतून भाजपा सिंधुदुर्ग आणि भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आज सावंतवाडीत भव्य बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भाजपा श्री’ या नावाने होणाऱ्या या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू असून, युवकांसह जिमप्रेमींमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा युवा मोर्चा सावंतवाडीचे अध्यक्ष हितेन नाईक आणि आंबोलीचे अध्यक्ष विनेश तावडे यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा पार पडणार आहे.

या भव्य स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि युवा आयडॉल विनोद राऊळ उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी रात्री महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आयोजनस्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांकडून विशेष मेहनत घेतली जात आहे. शरीरसौष्ठवपटूंच्या दमदार प्रदर्शनाचा थरार अनुभवण्यासाठी सावंतवाडीकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा