You are currently viewing २५ नोव्हेंबरला साटेली- भेडशीत डबलबारी भजनाचा जंगी सामना… 

२५ नोव्हेंबरला साटेली- भेडशीत डबलबारी भजनाचा जंगी सामना… 

दोडामार्ग :

 

साटेली – भेडशी येथे श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने दीपावली शो टाईम निमित्त २५ नोव्हेंबरला सायंकाळी ७.३० वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.

हा सामना श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ, देवगड, बुवा संदिप लोके, गुरुवर्य विजय परब, पखवाज योगेश सामंत, तबला संदेश सुतार विरुद्ध श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे कुडाळचे बुवा विजय उर्फ गुंडू सावंत गुरुवर्य अशोक सावंत, पखवाज विराज बांवकर, तबला प्रदिप वाळके यांच्यात रंगणार आहे. तरी सर्व भजन प्रेमींनी या डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ साटेली यांच्या कडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा