You are currently viewing सावंतवाडीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ३४ प्रकरणांना मंजुरी…

सावंतवाडीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ३४ प्रकरणांना मंजुरी…

सावंतवाडी

येथील संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ३४ लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष अशोक दळवी यांनी दिली. दरम्यान विधवा आणि अपंग लाभार्थ्यांच्या १९ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. याबाबत तालुका समितीची सभा श्री.दळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
यावेळी समितीचे सचिव तथा तहसिलदार श्रीधर पाटील, समितीचे सदस्य गजानन नाटेकर, नारायण राणे, सौ. भारती मोरे, उदय पारिपत्ये, दिगंबर परब, सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रतिनिधी, संजय गांधी योजना कार्यालय अव्वल कारकुन श्री. डी व्ही. मेस्त्री आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − one =