You are currently viewing शिवसेना वेंगुर्ला तालुका मासिक बैठक जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत संपन्न

शिवसेना वेंगुर्ला तालुका मासिक बैठक जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत संपन्न

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक बैठक व शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक आज जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.यावेळी आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय बांधणी व मागील झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा आढावा घेण्यात आला. तसेच दि.२६ ते २९ मे या कालावधीत होणाऱ्या शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाप्रमुख पडते यांच्यामार्फत आपल्या स्तरावर मार्गदर्शन व सूचना करण्यात आल्या.

यावेळी या सभेस शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सुनिल डुबळे, माजी नगरसेवक तुषार सापळे, युवासेनेचे पंकज शिरसाट, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, वायंगणी सरपंच सुमन कामत, दाभोली सरपंच उदय गोवेकर, प्रकाश गडेकर, अण्णा वराडकर, संजय परब, सुधाकर राणे, शंकर कुडव, सुनिल सातजी, अमित गावडे, रश्मी डिचोलकर, अनन्या धावडे, सुरेश भोसले, संदिप केळजी, सुनिल वालावलकर, रवि पेडणेकर, शैलेश परुळेकर, कोमल सरमळकर, दिलीप राणे, प्रतिभा खानोलकर आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दि.२६ ते २९ मे या कालावधीत शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.शिवसंपर्क अभियानामध्ये ठाकरे सरकारने घेतलेले व महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या शासनाच्या योजना व सिंधुरत्न योजना यांची सविस्तर व विस्तृत माहिती पुढील कालावधीत शिवसैनिकांना देण्यात येणार आहे.

या योजनेच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काही सूचना मांडल्या. पक्षवाढीसाठी या योजनेची परिपूर्ण माहिती देऊन जनतेपर्यंत पोहोचविण्यास शिवसेनेकडे दिल्यास त्याचा फायदा पुढील कालावधीत शेतकरी, बागायतदार, मच्छिमार, महिला बचतगट इत्यादींना होईल अशा सूचना काही पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आल्या. यावर जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी सदर योजनांसंदर्भात सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांच्याशी चर्चा करून कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा