कोरोना बाधितांचे नातेवाईक बाहेर फिरत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढतोय

कोरोना बाधितांचे नातेवाईक बाहेर फिरत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढतोय

योग्य ती उपाययोजना करावी; शिवसेना नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांची मागणी

सावंतवाडी

जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार होम विलगी करण बंद करून संस्थात्मक विलगी करण सुरू केले असताना शहरात अनेक ठिकाणी होम विलगी करण करण्यात येत असून, त्यांच्या घरातील नातेवाईक इतरत्र फिरत असल्याने, शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर सबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी सावंतवाडी नगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी केली आहे. शहरात सकाळच्या वेळी बाजारपेठ आणि मच्छी मार्केट मध्ये गर्दी होत असून, मच्छी मार्केट मध्ये विक्रेत्यांना दिलेल्या जागेच्या बाहेर अतिक्रमण करत विक्री करत आहेत. तर बाजारपेठेत देखील प्रचंड गर्दी होत असून, चारचाकी वाहने पार्क केली जात असल्याने, नागरिकांना अडथळा होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी या वाहनांना तेथे पार्किंग साठी बंदी घालावी त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन कोरोना संक्रमण आटोक्यात येईल. यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी मागणी बांदेकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा