You are currently viewing विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घ्या- कौस्तुभ गावडे….

विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घ्या- कौस्तुभ गावडे….

एन एस यू आय विद्यार्थ्यांच्या पाठीशी, बॉस्को ट्रेनिंग सेंटर ला इशारा….

देशात कोरोना आजाराचे संकट असल्याने महाराष्ट्र राज्यात सर्व परीक्षा ऑनलाईन होत आहेत परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॉस्को उद्योगशाळा व्होकेशन ट्रेनिंग सेंटर, पिंगुळी यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला असल्याने या निर्णयाला विद्यार्थ्याने विरोध केला आहे. तसेच बिजनेस इकॉनॉमिक चे शिक्षक सुरुवातीचे काही महिने गैरहजर असल्याने आणि कंप्युटर हा विषय शिकवला गेला नसल्याने या विषयाची परीक्षा देणार नसल्याचा निर्धार घेतला आहे. तसेच ६ ऑक्टोंबर ला परीक्षा वेळापत्रक जाहीर करून १५ ऑक्टोंबर पासून परीक्षा घेण्याचे कसे काय ठरवू शकतात असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावेळी एन.एस.यू.आय. जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांनी त्या सेंटर वर जात याबाबत जाब विचारला आहे. तसेच ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. एन एस यू आय या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून त्यांना न्याय मिळवून देईल असे देखील ते म्हणाले आहेत.

यावेळी एन एस यू आय चे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रणव गावडे, सावंतवाडी तालुका सरचिटणीस इंद्रनील अनगोळकर, सरचिटणीस दीपक पिरनकर, पदाधिकारी विशाल राऊत, हर्ष कोचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =