*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*लटकवून त्वरीत फासावर*
चिंता वाटते आता कळ्यांची
काय ठेवलेय *पुढे वाढून*
भविष्य सारे *अंधारलेले*
उपयोग काय जन्मा घालून
1
मिळता संधी करती माती
पहात नाहीत नाती गोती
पिसाटलेली अगम्य वृत्ती
करून घेते *लिंग तृप्ती*
2
दिवसा रात्री वखवखलेली
अतृप्त वृत्ती सुसाट सुटली
भय न उरले कायदेकानुचे
नात्यागोत्याची रेषा मिटली
4
स्थिती गेली भयापलीकडे
तुळशीमाते घ्यावे मनावर
व्हावी बिमोड अनावर वृत्ती
लटकवून त्वरीत फासावर
5
विनायक जोशी 🖋️ठाणे
मोबाईल/9324324157
