विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
विटा यंत्रमाग संघाचे संचालक,श्री बनशंकरी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,विटा शहरातील प्रतिथयश यंत्रमाग उद्योजक व देवांग समाजातील जुन्या पिढीतील एक आदरणीय, अजातशत्रु व्यक्तीमत्व वासुदेवनाना चोथे यांचे आज सायंकाळी वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयरोगाने दुःखद निधन झाले.
अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या वासुदेव नानांनी खुप मोठ्या कष्टाने यंत्रमाग व्यवसायात प्रगती साधली होती. आपल्याबरोबर आपल्या सर्व नातलगांची व मित्रपरीवाराची पण प्रगती झाली पाहीजे यासाठी वासुदेवनाना नेहमी प्रयत्नशील व मार्गदर्शक राहीले.
त्यांचे मागे पत्नी, एक भाऊ, दोन मुले, तीन मुली, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अस्थिविसर्जन सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता विटा कराड रोडच्या वैंकुठधाम स्मशानभुमीत आहे.
