*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ संध्या कुलकर्णी लिखित स्वादिष्ट पाककृती*
*तंबिट्टू उंडी (लाडू)*
साहित्य _: १ वाटी डाळ (चिवड्यात घालतो ती) १/२ वाटी तांदूळ पीठ, १/२ वाटी सुक्के खोबरे, पाव वाटी खारीक पावडर, तीळ खसखस २/२ चमचे, वेलची पूड, काजू,बदाम एक एक मूठ, लागेल तसे साजूक तूप, गूळ दीड वाटी ( तुमच्या चवी नुसार कमी जास्त घ्या)………………..
कृती _: डाळ,खोबरे,पीठ,तीळ, खस खस,काजू,बदाम, खारीक पावडर हे सर्व वेगवेगळे भाजून घेणे.थोडे कोमट झाले की त्यात गूळ घालून किंचित मीठ व वेलची पूड घालून मिक्सर वर बारीक करून घेणे.नंतर त्यात लाडू वळता येतील असे गरम तूप घालून लाडू वळणे…अगदी पौष्टिक लाडू तय्यार….ह्यात शेंगदाणे पूड पण घालू शकता….😋.. टीप _: ह्यात खजूर,मनुके पण घालू शकता.😊🙏…
