You are currently viewing पोल दुरूस्तीसाठी सोमवारी सावंतवाडीत विज पुरवठा खंडित

पोल दुरूस्तीसाठी सोमवारी सावंतवाडीत विज पुरवठा खंडित

सावंतवाडी

वीज वितरण कंपनीच्यावतीने गंजलेले लोखंडी पोल बदलण्यासाठी शहरात सोमवारी काही काळ विज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी वीज महावितरण कंपनीचे उपअभियंता कार्यालयाकडून करण्यात आले आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रक देण्यात आले आहे. यात असे म्हटले आहे की, सोमवार ८ मे ला सकाळी ९ ते सायंकाळी ६ ह्या वेळेत सावंतवाडी बाजारपेठ येथील मे. ईगल स्टोअर जवळील उच्चदाब वहिनीचा लोखंडी गंजलेला पोल बदलण्याचे नियोजन वीज महावितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे. तरी सदर काम करतेवेळी सावंतवाडी बाजारपेठ (गांधीचौक, विठ्ठल मंदिर परिसर, नगरपरिषद परिसर, जयप्रकाश चौक ) वसंत प्लाझा भाट बिल्डिंग, दुर्वांकुर बिल्डिंग येथील विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे. तरी सदर भागातील ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण उपविभाग सावंतवाडी यांच्यामार्फत प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा