*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*खिडकीचा एक कोपरा*
खुणावतो मला
खिडकीचा एक कोपरा
दिलासा बरा
मनाला…..
आभाळाचा तुकडा
त्यातून छान निरखावा
डोकावतो चांदवा
सांजवेळी…..
चमचम चांदणी
खिडकीशी खेळत येते
माझ्याशी करते
हितगूज….
कुंद वाटता
खिडकीचा पडदा सारावा
वारा अनुभवावा
शीतल….
येता जाता
बघते मी खिडकीतून
हसतात फांदीतून
फुलं…..
कधी उदासपणी
बंद करते खिडकी
जरी लाडकी
जागा…..
स्थिर मनाने
हळूच खिडकी उघडते
निवांत बघते
निसर्ग…..
एक कोपरा
साद घालतो खिडकीचा
स्वप्नात रमण्याचा
कवितेतून…..!!
०००००००००००००
🌺🍃००००००
अरुणा दुद्दलवार@✍️
