*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुर्याधंळा …!!*
नेशील कां मला समुद्रावर
स्पर्श करायचा मला त्या सुर्याला
प्रकाशलेल्या लाटा लाथाड्याच्या
जाब विचा-याचा.. त्या सुर्याला
तापलेल्या वाळूला.. तुडवायच
सुर्याच्या जन्माचा मातम मनवायचा
त्याच्यावर मला थुंकायचं …
मला त्याच्यावर थुंकायचं…
त्याच्या विझण्याचा जलौष करायचा
सुर्याला शिव्या शाप द्यायच्या मला
त्याची गचांडी धरून जाब विचा-याचा
अन् एक ..मुस्काडात द्यायची त्याला
माझ्या डोळ्यांत कां नाही उगवलास?
अरे! माझा तर एकचं जन्म !
तुझे अस्तित्व तर अनेक जन्माचे !
कोणत्या जन्मी फेडशील हे पाप ?
अरे सांग मला !सांग रे मला
कां नाही… उगवलास
तू ……माझ्या डोळ्यांत ?
कुठे फेडशील हे पाप…!!
कां..उगवलास नाही माझ्या डोळ्यांत
बाबा ठाकूर
