You are currently viewing आजपासून पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन !!

आजपासून पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन !!

आजपासून पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन !!

सिंधुदुर्ग

कोकण रेल्वे मार्गावर कोकणवासियांच्या सेवेत आणखी एका नवीन रेल्वे गाडीची भर पडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या दैनिक रेल्वेसेवेचा कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असून मुंबई–कोकण प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णवजी (VC द्वारे), केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री मा. पियुष गोयलजी (VC द्वारे) आणि उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे, मत्स्योद्योग व बंदरे मंत्री मा. नितेशजी राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महापौर रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून या नियमित रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार नारायणराव राणे साहेब आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे !!

गणेशोत्सवादरम्यानच कोकणवासियांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा