मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला रंगांचा अनोखा कलाविष्कार!
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी अम्ब्रेला पेंटिंग ॲक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली .कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व मान्यवरांच्या स्वागताने झाली. सदर उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते नववीची मुले सहभागी झाली होती. फॅब्रिक कलर्सचा वापर करून प्लेन छत्रीवर कॅलिग्राफी आर्ट आकर्षक पद्धतीने साकारण्यात आली. यात पावसाची बडबड गीते, घोषवाक्य, सुंदर विचार ,निसर्ग चित्रे रेखाटण्यात आली. तसेच सहभागी विद्यार्थ्यांनी मुक्त हस्ताने रंगांच्या छटा पसरवून रंगबिरंगी नक्षीकाम सुंदररीत्या साकारले .त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पानाफुलांची चित्रे व नक्षीकामे, निसर्गातील विविध आकार कुंचल्याने रेखाटून छत्र्यांचे सुशोभीकरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळाल्याने सर्व मुलांना अप्रतिम कलाविष्काराचा अनुभव आनंदाने घेता आला.यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना बी.एस. बांदेकर कॉलेजचे प्रा. सिद्धेश नेरूरकर, प्रा. तुकाराम मोरजकर यांनी विशेष मार्गदर्शन केले तसेच कॉलेजच्या विद्यार्थीनी कु. आर्या नागवेकर, कु. मृदुला ठाकूर यांनी देखील मार्गदर्शनात साथ दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेचे शिक्षक श्री. गणेश प्रभू, कलाशिक्षक श्री.कुलदीप कालवणकर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अमिना शेख यांनी केले व श्री. गणेश प्रभू यांनी आभार व्यक्त केले.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक श्री ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत , डॉ .श्री.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

