*अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय आयोजित तबला परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश :*
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय आयोजित तबला परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत प्रशालेतील एकूण ६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
प्रारंभिक (तबला) गटात इयत्ता ६ वी मधील कु. गौरंग परब , इयत्ता ५ वी मधील कु. आराध्य शेटवे आणि इयत्ता ७ वी मधील कु. राज गवस यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवत उत्तम कामगिरी केली.
तसेच इयत्ता ६ वी मधील कु. अद्वैत पाथरवट आणि इयत्ता ५ वी मधील कु. यज्ञेश पवार यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली.
त्याचप्रमाणे, प्रवेशिका प्रथम गटात इयत्ता ६ वी मधील कु. भुवन दळवी याने द्वितीय श्रेणी मिळवत यश संपादन केले.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेत मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे तबला शिक्षक श्री. प्रमोद विनायक मुंडये यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचा गौरव वाढला असून, त्यांच्या पुढील संगीत प्रवासासाठी शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी शुभेच्छा दिल्या.
