चौकशीअंती जनतेसह आंदोलन छेडणार – काँग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी

चौकशीअंती जनतेसह आंदोलन छेडणार – काँग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी

सावंतवाडीत स्थानिक जनतेकडून काल आलेल्या तक्रारी वरून प्रथम दर्शनी मुलाणी गाळा बेकायदेशीर दिसून येत आहे. या प्रकरणाचा मुळाशी जाऊन चौकशी करणार आहे. त्यानंतर वेळ पडल्यास नगरविकास मंत्री व कायद्याचा दरवाजा ठोठवणार असल्याचा इशारा कॉंग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी यांनी दिला आहे. तसेच समस्त सावंतवाडीतील जनतेसह आंदोलन देखील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात कायद्याचे टेंडर महत्वाचे असून, अन्य काही व्यवहार झाला आहे का ? याचा ही तपास केला जाईल असे देखील ते म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा