You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालयाचा निकाल 100 %

अर्जुन रावराणे विद्यालयाचा निकाल 100 %

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी प्रशाले तून मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेत पौरस मधुकर इंदप 94. 20% प्रथम क्रमांक, तमीश गजानन अडुळकर92.80%द्वितीय क्रमांक, तर शिवतेज नवीन घोडगे 92.20% तृतीय क्रमांक पटकाविला आहे
या प्रशाळेतून एकूण 56 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.
वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले व प्रोत्साहन दिले विभाग प्रमुख शिंदे सर,सावंत मॅडम, भोसले मॅडम, पवार सर, बोडेकर मॅडम,पाटील मॅडम,तुळसणकर सर, चोरगे सर,परीट मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधीक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी एस प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच पालक वर्गाकडून अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा