You are currently viewing पाडलोस प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त रविवारी रक्तदान शिबिर

पाडलोस प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त रविवारी रक्तदान शिबिर

पाडलोस प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त रविवारी रक्तदान शिबिर

ग्रामपंचायत, शतक महोत्सव समिती आणि ऑन कॉल रक्तदाते संस्थेचा संयुक्त उपक्रम; सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आयोजन

पाडलोस :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाडलोस नंबर एक या शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त रविवारी, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत पाडलोस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडलोस नंबर एक शतक महोत्सव समिती आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर पाडलोस नंबर एक प्राथमिक शाळेत सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिरात इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्तदानासाठी अधिक माहितीसाठी पाडलोसचे उपसरपंच राजू शेटकर (९४२१२६५०५०), ग्रामपंचायत अधिकारी आळवे मॅडम (९४२३२५७४५३), शिक्षक विजय गावडे (९४२०३६६२८१), ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे (८३९०९०५२६९) आणि खजिनदार सिद्धार्थ पराडकर (९४२२९६७२४९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा