You are currently viewing बांदा केंद्रशाळेची प्राची गवस राख्या बनवून घेत आहे स्वनिर्मितीचा आनंद

बांदा केंद्रशाळेची प्राची गवस राख्या बनवून घेत आहे स्वनिर्मितीचा आनंद

बांदा

जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं .१ शाळेतील स्काऊट गाईड पथकातील इयत्ता सातवीत शिकणारी विद्यार्थीनी कुमारी प्राची मनोहर गवस हिने लाॅकडाऊन कालावधीत शाळा बंद असल्यामुळे घरी स्वनिर्मित विविध प्रकारच्या आकर्षक राख्या बनविल्या आहेत. तिने बनवलेल्या यातील काही राख्या भारत देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांना पाठविण्यात येणार आहेत. प्राचीने खूप आकर्षक अशा या राख्या बनविल्या असून ती या राख्यांची विक्री सुध्दा करत असून यातून करी कमाईचा आनंदही घेत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले वर्षभरापासू बंद असल्या तरीही मोबाईलपासून अलिप्त राहून प्राचीने स्वनिर्मित राख्या बनविण्याचा जोपासलेला छंद सर्व विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण करणारा आहे. प्राचीला बांदा केंद्र शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व पालकांचे मार्गदर्शन मिळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =