वेंगुर्लेत ६ ते १५ मे जनता कर्फ्यु जाहीर….

वेंगुर्लेत ६ ते १५ मे जनता कर्फ्यु जाहीर….

आ.केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक

वेंगुर्ला

कोरोना संक्रमणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत ६ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तहसील कार्यालयात आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, विभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा पाटील, मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर, डॉ अतुल मुळे, सर्व पक्षांचे तालुकाप्रमुख, सरपंच, व्यापारी उपस्थित होते.

सकाळी ६ ते ९ या वेळेत फक्त दूध विक्री होणार असून सध्या सुरू असलेल्या आंबा हंगामामुळे आंबा काढणी विक्रीस मुभा देण्यात आली आहे. तर अनावश्यक फिरणाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा