You are currently viewing भाजप महिला मोर्चाने साजरी केली राजमाता जिजाऊ जयंती

भाजप महिला मोर्चाने साजरी केली राजमाता जिजाऊ जयंती

देवगड

देवगड येथील तालुका भाजप महिला मोर्चाच्यावतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती जामसंडे येथे साजरी करण्यात आली. यावेळी काही ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला.
जामसंडे येथील टिळक स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी मंचावर लक्ष्मी भगवान खवळे, रजनी कांदळगांवकर, वैशाली तोडणकर, शुभांगी कदम, प्राची मेस्त्री आदी उपस्थित होत्या. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. शरयु ठुकरूल, प्राजक्ता घाडी, तन्वी शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, महिला तालुकाध्यक्षा उषःकला केळुसकर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या संयोजिका नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी जिजाऊंबाबत माहिती दिली. मनस्वी घारे यांनी गीत सादर केले. निमंत्रित महिलांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन नगरसेविका प्रणाली माने यांनी केले. आभार सीमा लंगोटे यांनी मानले. यावेळी माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, नगरसेविका रूचाली पाटकर, श्‍वेता शिवलकर, सायली पारकर यांच्यासह अन्य महिला तसेच योगेश चांदोस्कर, उमेश कणेरकर, नगरसेवक शरद ठुकरूल मिलिंद माने ,दयानंद पाटिल बापु जुवाटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − five =