You are currently viewing उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

मालवण :

पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या भारतीय नौसेना दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. 30 नोव्हेबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने राजकोटकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारी पाहणी. सायंकाळी 4 वाजता मोटोरीने चिपी विमानतळ सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. 4.30 वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारीबाबत बैठक. स्थळ:- चिपी विमानतळ जि. सिंधुदुर्ग सायं. 5.15 वाजता चिपी विमानतळ येथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =