You are currently viewing सावंतवाडी भाजपाच्या भटके-विमुक्त आघाडी बांदा मंडल अध्यक्षपदी विजय जंगले तर आंबोली मंडल उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड

सावंतवाडी भाजपाच्या भटके-विमुक्त आघाडी बांदा मंडल अध्यक्षपदी विजय जंगले तर आंबोली मंडल उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड

नगराध्यक्ष संजू परबांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करत भाजप भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी निवडी केल्या जाहीर

सावंतवाडी

भाजपाच्या भटके-विमुक्त आघाडीच्या सावंतवाडी तालुका बांदा मंडल विजय जंगले यांची निवड करण्यात आली आहे. तर आंबोली मंडल उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती झाली आहे. ही निवड आमदार नितेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. दरम्यान याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच त्यांना सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या हस्ते प्रदान करत भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी निवडी केल्या जाहीर.
याप्रसंगी बोलताना श्री.जंगले म्हणाले भाजपा वाढीच्या दृष्टीने आम्ही तालुक्यात प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला विजय मिळावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढील कार्य केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व पदाधिकारी सावंतवाडी तालुका दौऱ्यावर असताना या निवडी जाहीर केल्या.भाजप भटके विमुक्त आघाडी मजबूत करण्याकरता काळे जिल्हा दौरा करीत आहेत. भविष्यात जिल्ह्यात भाजपा मोठी ताकद निर्माण करून देणार असा विश्वास जिल्हा अध्यक्ष काळे यांनी व्यक्त केला.लागेल ते सहकार्य आमच्याकडून मिळेल भाजप नेते संजू परब यांनी काळे यांना दिला शब्द.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित, भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, उपाध्यक्ष संदीप होळकर, भटके विमुक्त जाती व जमाती कृती समितीचे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण, आंबोली मंडल अध्यक्ष भरत गोरे, धाकू शेळके,दिपक पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा