You are currently viewing सीमाशुल्क अधिकारी सत्यवान रेडकर यांचे नि:शुल्क स्पर्धा परीक्षा व्याख्यान

सीमाशुल्क अधिकारी सत्यवान रेडकर यांचे नि:शुल्क स्पर्धा परीक्षा व्याख्यान

सावंतवाडी

 

सीमाशुल्क अधिकारी, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे कणकवली तसेच मालवण तालुक्यात ४ ते ६ एप्रिल २०२३ रोजी निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानेस्पर्धा परीक्षा संदर्भात संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात आपल्या व्याख्यानांचे वादळ निर्माण करणारे, शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण करण्यासाठी अविरतपणे शैक्षणिक ज्ञानदान करणारे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र, माननीय श्री. सत्यवान यशवंत रेडकर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खालील वेळापत्रकाप्रमाणे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रदान करणार आहेत.

मंगळवार, दिनांक ४ एप्रिल २०२३ सकाळी ९.०० वा, बाळ शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली

बुधवार, दिनांक ५ एप्रिल २०२३ सकाळी ९.०० वा., आर ए यादव हायस्कूल, आडवली, ता. मालवण

दुपारी २.०० वा., जनता विद्यामंदिर त्रिंबक सभागृह, ता. मालवण

गुरुवार, दिनांक ६ एप्रिल २०२३ सकाळी १०.०० वा., माता वैष्णोदेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ओसरगाव, ता. कणकवली

जास्तीत जास्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माननीय, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =