एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा
कणकवली :
कणकवली पंचायत समितीच्या सभापतीपदी नांदगाव पंचायत समितीच्या सदस्या हर्षदा वाळके यांची निवड झाली असून उपसभापतीपदी वरवडे पंचायत समितीचे सदस्य राजेश उर्फ सोनू सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी नवनिर्वाचित सभापती हर्षदा वाळके आणि उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
