You are currently viewing मसुरे सुपुत्र राष्ट्रपती पदक विजेते आणि समाज सेवक विजय शंकर दूखंडे यांचे निधन..

मसुरे सुपुत्र राष्ट्रपती पदक विजेते आणि समाज सेवक विजय शंकर दूखंडे यांचे निधन..

मसुरे :

 

मसुरे गडगघेरावाडी येथील रहिवासी आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले महाराष्ट्र पोलीस दलातील राष्ट्रपती पदक विजेते पोलीस दलाची शान असलेले निवृत्त पोलीस अधिकारी, समाजसेवक, गरिबांचे दाते विजय शंकर दूखंडे वय ७८ यांचे नुकतेच ठाणे येथे निधन झाले. ठाणे येथील स्मशानभूमीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई पोलीस दलामध्ये मास्टर या टोपण नावाने त्यांची ओळख होती.विजय दुखंडे यांच्या निधनामुळे मसुरे गावावरती शोककळा पसरली आहे.

मसुरे येथील सामाजिक क्षेत्रात विजयदुखंडे यांचे मोठे नाव होते. गावातील धार्मिक उत्सवात ते सहभागी असायचे. गावातील अनेक मंदिरांना, गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी शैक्षणिक निधी त्यांनी दिला होता.अनेक गरजू गरजवंत कुटुंबांना वेळोवेळी आर्थिक स्वरूपात मदत केली. गावातील अनेक गरजू गरीब मुलांना त्यांनी मुंबई येथे नोकरी मिळवून दिली होती तसेच काही कुटुंबांना राहण्यासाठी मोफत सोय करून दिली होती.

मसूरे येथील गरीब शेतकऱ्यांना, अनेक युवकांना रोजगारासाठी आर्थिक मदत दिली होती. अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी मदत केली.गावातील कला, क्रीडा,धार्मिक, सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहून सर्वांच्या पाठीशी दिलदारपणे विजय दुखंडे राहत होते. अनेक तालुका जिल्हा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा भरवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. गावात होणारे सांस्कृतिक कार्यक्रमांना आर्थिक स्वरूपात मदत करून या सर्वांच्या पाठीशी ते खंबीरपणे राहत होते. मसुरे गावात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही दिवस पान विक्रीचा व्यवसाय केला होता. अतिशय खडतर परिस्थितीत बोटीने त्यांनी मुंबई गाठून काही वर्ष मील मध्ये सुद्धा नोकरी केली होती. यानंतर त्यांनी पोलीस दलात नोकरी करताना पोलीस दलाचे, महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. गुन्हेगारी जगतात ते मास्टर या टोपण नावाने मुंबईमध्ये त्यांची ओळख होती. विविध व्हीआयपी यांना त्यांच्या ताब्यात असणाऱ्या मोटरसायकल ट्रेनिंग चे ट्रेनर म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. अनेक गुन्ह्यांचा त्यांनी छडा देशभर फिरून लावला होता. त्या काळात वेश पालटून गुन्हेगारांचा छडा लावण्यात महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्यांचा नंबर वन होता. त्यांच्या अंगात सर्व कला भीणलेल्या होत्या. पोहणे,धावणे या मध्ये सुद्धा ते मास्टर होते. समुद्रामध्ये, नदीमध्ये उडी मारून प्रसार होणाऱ्या अनेक गुन्हेगारांना त्यांनी लीलया पकडले होते. गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख होती. परोपकारी आणि हसतमुख हसतमुख स्वभाव असल्यामुळे सर्व मसुरे ग्रामस्थांच्या हृदयामध्ये त्यांनी एक आधाराचे स्थान निर्माण केले होते त्यांच्या पश्चात एक मुलगा सून दोन मुली जावई नातवंडे पुतणे पुतणी असा मोठा परिवार असून येथील युवा व्यवसायिक विनायक उर्फ बाबू दुखंडे, स्मिता राणे, कुसुम राऊत यांचे ते वडील, उद्योजक बाळा दुखंडे यांचे बंधू आणि मसूरे येथील रिक्षाव्यवसायिक महेश दूखंडे, आदर्श जिल्हा परिषद शिक्षक किसन दूखंडे यांचे ते काका तर युवा सामाजिक कार्यकर्ते रोशन दूखंडे यांचे ते आजोबा होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा