You are currently viewing राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी…

राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी…

कणकवली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती कणकवली तालुका काँग्रेस कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ कविवर्य व साहित्यिक महेश काणेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर,तालुका सरचिटणीस व सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीण वरूनकर, कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली, तालुका युवक अध्यक्ष निलेश तेली, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप कुमार जाधव, प्रदीप तळगावकर, कमलाकर तांबे, नादीरशहा पटेल, श्री कामत, राजू वर्णे,  राजेंद्र सावंत, संतोष तेली यावेळी उपस्थित होते.
यावेळी  महेश काणेकर यांनी गांधी विचारांची महती प्रकट केली व आजच्या पिढीला गांधीजींच्या विचारांची कशी गरज आहे याची महती पटवून दिली तसेच यावेळी लाल बहादूर शास्त्री यांच्या विचाराची देखील महती सांगण्यात आली व त्यांना देखील विनम्र अभिवादन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =