सावंतवाडी शहरात परदेशातून एक व्यक्ती आली आहे. त्या व्यक्तीला पालिकेने दहा दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे. ही व्यक्ती परदेशातून १५डिसेंबरला मुंबईमागेॅ सावंतवाडीत आली.पालिकेच्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली ही व्यक्ती आहे. ती व्यक्ती ब्रिटनमधुन आली की नाही याबाबत पालिकेला माहिती नाही. केवळ परदेशातून आल्याचे पालिकेला कळविण्यात आले आहे. त्यामुळे तिला क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिचा अहवालही कोरोना निगेटिव्ह आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा संसर्ग आढळल्याने जग हादरले आहे. नवा कोरोना अधिक फैलावतो. भारतातही याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व जिल्हा प्रशासनाला याबाबत अलर्ट करण्यात आले आहे. ब्रिटनमधून आणि परदेशातून आलेल्या नागरिकावर आरोग्य प्रशासन लक्ष देऊन आहे. या पार्श्वभूमीवर ही व्यक्ती निगराणीखाली आहे.
परदेशातून आलेली ती व्यक्ती कोणत्या देशातील,?…सावंतवाडीत क्वारंटाईन
- Post published:डिसेंबर 25, 2020
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
मालवण नगरपरिषदेद्वारे आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमांचे कुडाळ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडून कौतुक
जिल्ह्यात एकूण 2 हजार 648 जण कोरोना मुक्त.
दर्जेदार औषधे व कीटकनाशके द्या, अन्यथा गय करणार नाही – नितेश राणे
