You are currently viewing एलसीबी पथकाच्या कारवाईत साकेडी येथे 21 हजाराची गावठी दारू जप्त

एलसीबी पथकाच्या कारवाईत साकेडी येथे 21 हजाराची गावठी दारू जप्त

कणकवली

साकेडी बोरीचीवाडी येथे रविवारी दुपारी सव्वा बारा वाजता एलसीबी पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीच्या पथकाने छापा करून गावठी हटभट्टीचा अड्डा उध्वस्त केला. गावठी दारुसह 21 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी साकेडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हापसेकर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस नाईक आशिष जमादार यांनी दिली असून या कारवाईत एएसआय कोयंडे, हवालदार कृष्णा केसरकर सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा