*जागतिक साकव्य विकास मंच तथा साहित्यरत्न लेखणीसम्राट विचारमंच महाराष्ट्रचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*टिकलीच्या आवाजातली दिवाळी (लावणी)*
टिकली वाजली की जीव माझा नाचतो,
सण आला म्हणून गाल माझा लाजतो ॥ध्रु॥
अंगणात रांगोळी मी काढली भारी,
लक्ष्मी येईल म्हणूनी वाट मी पाहिली,
पणती लावता अंधार पळाला,
तुम्ही येता घर उजळला,
टिकली वाजली की जीव माझा नाचतो ॥१॥
चोळीवर टिकलीचा आवाज घुमतो,
बांगड्याच्या तालावर जीव झुमतो,
फटाका फुटला की मी दचकते,
तुमच्या मिठीत येऊन लपकते,
टिकली वाजली की जीव माझा नाचतो ॥२॥
फराळ नको मला, गोड बोलणं हवं,
भेट नको, तुमचं जवळ येणं हवं,
दिवाळीच्या दिवशी एवढंच मागणं,
हातात हात घेऊन सोबत चालणं,
टिकली वाजली की जीव माझा नाचतो ॥३॥
इंदुमाय म्हणे हीच खरी दिवाळी,
जिथे दोन जीवांची होते रांगोळी ॥४॥
रचयिता – श्री प्रभाकर भामरे (इंदुमाय)
गाव – मेहेरगाव, ता. धुळे, जि. धुळे
