You are currently viewing उद्योजक फ्रान्सिस डिसोझा ऊर्फ ‘सायबा’ यांचे निधन

उद्योजक फ्रान्सिस डिसोझा ऊर्फ ‘सायबा’ यांचे निधन

सावंतवाडी
सावंतवाडी कोलगाव येथील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस तमास डिसोझा (६२) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते सायबा नावाने परिचित होते. त्यांचे पार्थिव निवासस्थानी सोमवारी सकाळी ८ ते १० या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी १०:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आणि उद्योजक थॉमसन डिसोजा यांचे ते वडील होत.
सहकार क्षेत्रात भरीव योगदान देताना त्यांनी कोलगाव सोसायटीचे अनेक वर्षे चेअरमन, क्याथलिक बँकेचे व्हॉईस चेअरमन, जिल्हा व तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अशी अनेक पदे भूषविली. कोलगाव ग्रामपंचायतमध्ये ३५ वर्षे कार्य करताना अनेक वर्षे सरपंच, उपसरपंचपदाच्या कारकीर्दीत गावाचा विकास केला. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळावर काम केले. ते विट उत्पादक व लाकूड व्यावसायिक म्हणून जिल्ह्यात प्रसिध्द होते. बांबू उत्पादनात त्यांनी क्रांती करून आदर्शवत बांबुची शेती केली. कोलगाव परिसरात ते गोरगरिबांचे आधारवड होते. लाखो रूपयांची त्यांनी पदरमोड करून सामाजिक बांधिलकी जोपासली. शेकडो कुटुंबाना त्यानी रोजगार दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =