खनिकर्म योजनेतून प्रा.आरोग्य केंद्र आडेली रुग्णवाहिकेचे लोकार्पण

खनिकर्म योजनेतून प्रा.आरोग्य केंद्र आडेली रुग्णवाहिकेचे लोकार्पण

वेंगुर्ला

महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म योजनेतून प्रा.आरोग्य केंद्र आडेली साठी प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आडेली गावचे माजी सरपंच व शिवसेनेचे जेष्ठ नेते प्रकाश गडेकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व पुष्पहार अर्पण करून संपन्न झाला.

या प्रसंगी आडेली गावचे सरपंच संतोष कासले, दाभोली गावचे सरपंच उदय गोवेकर, आडेली गावचे माजी सरपंच भारत धर्णे, सोमेश्वर सेवा सहकारी सोसायटी आडेलीचे माजी चेअरमन चंद्रकांत गडेकर, श्री गिरेश्वर सेवा सहकारी सोसायटी वजराठ चे चेअरमन बाबुराव परब, वैद्यकीय अधिकारी डाॅ.संजीवनी पाटील, डॉ.वंदन वेंगुर्लेकर, आरोग्य सेवक शेखर कांबळी, आरोग्य सहाय्यक एस.व्ही सावंत. वेंगुर्ले शिवसेना उप तालुका प्रमुख उमेश नाईक, पालकरवाडी गावचे माजी सरपंच बाबा वराडकर, आडेली ग्रामपंचायत सदस्य लिलाधर मांजरेकर, सौ.प्राजक्ता मुंड्ये, सौ. छाया गावडे तसेच वायगंणी ग्रामपंचायत सदस्य आनंद दाभोलकर, आडेली शिवसेना शाखाप्रमुख अशोक गावडे, अण्णा वजराठकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नितीन मांजरेकर, प्रशांत मुंड्ये, सचिन गडेकर, प्रविण गडेकर, सर्पमित्र दिपक दुतोंडकर , संदिप कांबळी, कुणाल बिडये, बाळा धुरी, शुभम गडेकर, आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा