You are currently viewing नाना पटोले राज्याचे मुख्यमंत्री होऊं देत…

नाना पटोले राज्याचे मुख्यमंत्री होऊं देत…

वाढदिवसानिमित्त रामेश्वर चरणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे गाऱ्हाणे…

मालवण

काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील तालुका काँग्रेसच्या वतीने शहरातील रामेश्वर मंदिरात येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार येऊन नाना मुख्यमंत्री होऊंदेत असे गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी श्रीदेव रामेश्वराची दुग्धाभिषेक पूजाही करण्यात आली.

यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, संदेश कोयंडे, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, श्रेयस माणगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + one =