You are currently viewing कळणे च्या सुकन्येची सातासमुद्रापार झेप : कळणे सरपंच प्रिया नाईक यांनी केले अभिनंदन

कळणे च्या सुकन्येची सातासमुद्रापार झेप : कळणे सरपंच प्रिया नाईक यांनी केले अभिनंदन

उच्च शिक्षणासाठी वेदिका संतोष देसाई हिची अमेरिकन विद्यापीठात निवड

कळणे सरपंच प्रिया नाईक यांनी केले अभिनंदन

दोडामार्ग

तालुक्यातील कळणे गावात सामान्य कुटुंबात जन्मलेल्या वेदिका संतोष देसाई हिची उच्च शिक्षणासाठी अमेरिका विद्यापीठात निवड झाली आहे. ती अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेट मध्ये एनजेआयटी विद्यापीठात मास्टर इन इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग चे शिक्षण घेणार आहे.ही बाब तालुका वासीयांसाठी आभिमानास्पद असून तिच्या या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी ग्रामपंचायत कळणे च्या सरपंच सौ. प्रिया मिलिंद नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वेदिका देसाई हिच्या कुटुंबियांसह कळणे गाव व दोडामार्ग तालुक्यासाठी ही गर्वाची व अभिमानाची बाब असल्याचे यावेळी सरपंचा सौ. प्रिया नाईक म्हणाल्या.

यावेळी सरपंच प्रिया मिलिंद नाईक यांसह ग्रामसेवक नामदेव परब, शिवसेना उप तालुकाप्रमुख मिलिंद नाईक अगंणवाडी सेविका सुचिता साळगांवकर, विद्या गवस, दीपाली सावंत, गौरी कळणेकर, रामा कांबळे, निलेश देसाई, प्रविण देसाई आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा