You are currently viewing सिंधुनगरी येथील बीएसएनएल टॉवरला आग; स्क्रॅप मटेरियल जळून खाक

सिंधुनगरी येथील बीएसएनएल टॉवरला आग; स्क्रॅप मटेरियल जळून खाक

सिंधुनगरी

सिंधुनगरीत  रविवारी सायंकाळी दूरसंचार विभागाच्या टॉवरला आगीने घेरल्यामुळे टॉवरवरील केबल व दूरसंचार विभागाच्या स्क्रॅप मटेरियल या आगीत जळून खाक झाले. ओरोस पोलीस ठाण्याला ही घटना समजतात तात्काळ कुडाळ एमआयडी चे अग्निशमन दल पोहचला व त्यामुळे दूरसंचार विभागाची मोठी हानी टळली.

प्रशासकीय संकुला नजीकच असलेला बीएसएनएल चा टॉवर व कार्यालयीन इमारत तसेच निवासस्थाने असून सध्या बीएसएनएल विभागाने ही मालमत्ता दुर्लक्षित केल्यामुळे वाढलेल्या गवतास रविवारी सायंकाळी सव्वा 7 च्या दरम्याने लागलेली आग बीएसएनएलच्या टॉवर पर्यंत पोहोचली आणि या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान कुडाळ एमआयडीसी चा 7. 35 च्या दरम्याने बंब दाखल झाला व ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुडाळ नगरपंचायतीचे अग्निशमन दल पोहचले.

कुडाळ एमआयडीसी अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर जे आर तडवी,  के वाय साळुंखे,  आर ए मर्डे. गुडेकर पोटे व डिचवलकर व गुडेकर या अधिकारी व अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे दूरसंचार विभागाचे फार मोठे आर्थिक नुकसान टळले याआगीत बीएसएनएलच्या स्क्रॅप मटेरियल चे हे फार मोठे नुकसान झाले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − two =