You are currently viewing अन्न पाहिले नाही असे …

अन्न पाहिले नाही असे …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*अन्न पाहिले नाही असे …..*

अन्न पाहिले नाही असे जेवतात काही लोक
यजमान बिचारा बोलू शकत नाही रोखठोक
खर्च किती होतो त्याचा पहा जेवणावरती
कंबर मोडून जाते लग्नात बापाची त्या पुरती..

अस्से वाढून घेतात लोक बकासुरासारखे
बाहेर उभे असतात किती अन्नाला जे पारखे
प्लेट ओसांडून जाते अर्धे अन्न फेकतात
अन्नदात्याचा ते केवढा अपमान करतात…

एक दाणा पिकवायला केवढी मेहनत लागते
घाम जिरतो जमिनीत तरच माती पिकते
रक्ताचे पाणी करून जोपासतो बांध बांध
आणि मग सळसळतं पिकतं पहा रान…

ह्यांना काय कळणार हो ह्यांचा पाऊस बॅंकेत
बासमतीत हात यांचा लोकनेते काखेत
व्यथा कशा पोहोचणार काळीजच नाही
बाकी सोडा विचारत नाहीत सख्खी आई…

लोक हो विचार करा पोटभर जरूर जेवा
अन्न हे परब्रह्म ह्यावर विश्वास ठेवा
शेकडोंनी गरीब येथे रोज वणवण फिरतात
अन्नावाचून कुपोषित प्राण ही गमावतात …

जमलं तर त्यांना आपण जरूर मदत करू
घासाघासाला गरीब मनामध्ये स्मरू
उरलेले अन्न आपण अनाथाश्रमात द्यावे
कोणी काहीच ठेवलेलं नाही त्यांच्या नावे…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ११ मे २०२३
वेळ : दुपारी १/३४

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा