You are currently viewing वैभववाडी शहरात स्टॉल बांधकाम कामाचा आ. नितेश राणे यांच्याहस्ते शुभारंभ

वैभववाडी शहरात स्टॉल बांधकाम कामाचा आ. नितेश राणे यांच्याहस्ते शुभारंभ

वैभववाडी

वैभववाडी शहर नीटनेटक दिसलं पाहिजे. ते विद्रूप होता कामा नये, यासाठीच प्रशासनाने स्टॉल हटाव मोहीम घेतली होती. मात्र ठरल्याप्रमाणे प्रशासनाला विश्वासात घेऊन आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने स्टॉल उभे करत आहोत. लवकरच व्यावसायिकांना हक्काचे स्टॉल उपलब्ध होतील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वैभववाडी शहरात स्टॉल बांधकाम कामाचा शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. माजी वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी नारळ फोडून या कामाचा शुभारंभ केला.

यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईंणकर, माजी सभापती अरविंद रावराणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, सज्जनकाका रावराणे, प्राची तावडे, हुसेन लांजेकर, नगरसेवक रोहन रावराणे, नवलराज काळे, प्रकाश पाटील, विवेक रावराणे, बंड्या मांजरेकर, रत्नाकर कदम, स्नेहलता चोरगे, नगरसेविका सुंदरा निकम, संगीता चव्हाण, यामिनी वळवी, सुप्रिया तांबे, राजन तांबे, सुभाष रावराणे, सुरेश बोडके, मारुती मोहिते व पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नितेश राणे म्हणाले, शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधण्यात आलेले स्टॉल नगरपंचायतीच्या वतीने हटविण्यात आले होते. दरम्यान स्टॉल धारकांना आम्ही स्टॉल उपलब्ध करून देणार असा शब्द दिला होता. प्रत्येकाच्या आयुष्यात परिवर्तन करणाऱ्यापैकी आम्ही आहोत. आदरणीय नारायण राणे साहेब यांचे आमच्यावर संस्कार आहेत. हटाव मोहिमे वेळी काहींना आमचा राग आला. आमच्यावर टीका झाली, उपोषण झाली. परंतु आम्ही शब्द पूर्ण केला आहे. आता अधिकृत जागेत स्टॉल मिळणार आहेत ते स्टॉल तुमचे कोणीही हटवू शकणार नाही. प्रशासनाला विश्वासात घेऊन आम्ही पाऊल टाकले आहे. आमच्यावर विश्वास ठेवून ज्या स्टॉल धारकांनी संयम राखला, शांत राहिले त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत असे आमदारा नितेश राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा