You are currently viewing वेंगुर्ल्यात वादळी पावसामुळे १ लाख ८० हजाराचे नुकसान…

वेंगुर्ल्यात वादळी पावसामुळे १ लाख ८० हजाराचे नुकसान…

वेंगुर्ल्यात वादळी पावसामुळे १ लाख ८० हजाराचे नुकसान…

वेंगुर्ले

तालुक्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे परुळे बाजार, पेंडूर, शिरोडा व शिरोडा-गांधीनगर येथील ४ कुटुंबीयांचे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची नोंद तहसील कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षात करण्यात आली आहे.

नुकसान झालेल्यांमध्ये परुळे बाजार येथील कानू लूमाजी परब त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या माडाच्या झाडावर वीज पडून घरातील विद्युत उपकरणे खराब होऊन सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. पेंडूर येथील कृष्णा गोविंद काळोजी यांच्या घरातील मीटर मध्ये पाऊस चालू असताना अचानक बिघाड होऊन घरातील विद्युत उपकरणे निकामी होऊन सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरोडा गांधीनगर येथील भगीरथ हाडये यांच्या घरावर माडाचे झाड पडून घराचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शिरोडा येथील दत्ताराम नारायण गावडे यांच्या घरावर माडाचे झाड पडून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे तुटून वीज वाहिन्यांवर कोसळल्याने तालुक्यातील वीजपुरवठा सायंकाळी खंडित झाला. तो रात्री १२.३० वाजता तात्पुरता सुरू करण्यात आला. आज सकाळी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत सुरू केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा