You are currently viewing गोव्यात रक्ताचा तुठवडा, युवा रक्तदाता संघटना घेणार शिबीर

गोव्यात रक्ताचा तुठवडा, युवा रक्तदाता संघटना घेणार शिबीर

सावंतवाडी

गोवा बांबुळी हॉस्पिटल रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुठवडा असल्या कारणाने रक्त पेढीतील अधिकाऱ्यांनी युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी यांना तातडीने रक्तदान शिबिर घेण्याची विनंती केली आहे. सदरच्या रक्तदान शिबिराचे नियोजन दोन दिवसात करण्यात येणार आहे. तरी रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन रुग्णांना जीवदान मिळावं यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी यांच्याकडून करण्यात आलेले आहे. रक्तदान करणाऱ्या इच्छुक रक्तदात्यांनी देव्या सूर्याजी 9922083238, रवी जाधव 9405264027 यांना संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =