You are currently viewing भाजप प्रणित एस.टी सेवाशक्ती संघर्ष कामगार संघाच्या मागणीला यश…

भाजप प्रणित एस.टी सेवाशक्ती संघर्ष कामगार संघाच्या मागणीला यश…

भाजप प्रणित एस.टी सेवाशक्ती संघर्ष कामगार संघाच्या मागणीला यश…

वेंगुर्ला आगाराच्या कामाची एस.टी बांधकाम अधिकाऱ्यांकडून पाहणी

वेंगुर्ले

येथील एस.टी आगाराच्या नूतनीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने भाजप प्रणीत सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांकडे केलेल्या मागणीनुसार हे काम रोखण्यात आले होते. आज सहाय्यक अभियंता अक्षय केकरे व कनिष्ठ अभियंता गिरीजा पाटील यांनी कामाची पहाणी केली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार हे काम पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी जुन्या लोखंडी छप्पराला काढण्यात येणारा कलर तसेच कार्यशाळेच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या काँक्रिटची टाॅप लेव्हलची ऊंची वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असुन कामगार वर्गात विशेषतः कार्यशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, शशी करंगुटकर, सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाचे सखाराम बाबुराम सावळ, साई दाभोलकर, रघुनाथ तळवडेकर, दाजी तळवणेकर, प्रमोद परूळेकर, प्रकाश मोहोते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा