You are currently viewing वैभववाडीतील हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे १२ परीक्षेत वर्चस्व कायम…

वैभववाडीतील हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे १२ परीक्षेत वर्चस्व कायम…

कला, वाणिज्य व विज्ञान तिन्ही शाखांचा १००% निकाल; महाविद्यालाची चित्रा प्रभू तालुक्यात प्रथम…

वैभववाडी

तालुक्यातील कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान शाखेमधून कु.सायली सुरेश जांभवडेकर हिने ८७.८३% गुण मिळवत विज्ञान शाखेत तालुक्यासह प्रशालेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर कु.दिव्या दत्ताराम गुरव हिने ७५.६७ % गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर कु.डिंपल प्रकाश माने हिने ७४.८३ % गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

वाणिज्य शाखेमधून कुमारी चित्रा प्रदीप प्रभू हिने ९०.००% गुण मिळवत वाणिज्य शाखेत तालुक्यासह प्रशालेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर कु.तुषार चंद्रकांत पार्टे याने ८६.१७%गुण मिळवत द्वितीय क्रमांक आणि कु. सानीया सुरेश मोरे हिने ८२.१७ % गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

कला शाखेतून कु.सनोली संतोष पवार ८४.६७ % गुण मिळवत कला शाखेत तालुक्यासह प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला तर कु. श्वेता सुरेश सावंत ८३.८३ % गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला व कु.तन्वी रमेश पवार हिने ८०.५०% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी.एस. प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच पालक वर्गाकडून अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =