You are currently viewing राजापूर तालुका भटके विमुक्त आघाडी पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक

राजापूर तालुका भटके विमुक्त आघाडी पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक

मसुरे :

प्रदेश उपाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी श्री. बाळा गोसावी,सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी नवलराज काळे, अनिल करंगुटकर भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव, भाजपा भटके विमुक्त आघाडी राजापूर तालुका अध्यक्ष सुनील पवार भाजप यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूर तालुका भटके विमुक्त आघाडी पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक राजापूर येथे
पार पडली.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष पटेल मॅडम, राजापूर भाजपा महिला अध्यक्ष जठार मॅडम, स्वप्निल गोठणकर, दीपक पवार,अल्केश पवार, सर्जेराव मोहिते, विनोद पवार, रेखा पवार, हिराबाई पवार विमुक्त आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर बैठक भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश अध्यक्ष राहुल भैया केंद्रे, प्रदेश सरचिटणीस राजू साळुंखे व प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी यांनी महायुतीचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य पदाधिकाऱ्यांसमोर मांडत भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांना मतदान करण्याचे आवाहन केले. तर जिल्हा प्रभारी नवलराज काळे यांनी दहा वर्ष विनायक राऊत यांनी केलेल्या निष्क्रिय कामाची पोच पावती त्यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत करून दिली पाहिजे. भारताला सर्वोच्च पदावर घेऊन जाण्यासाठी देशाचे नरेंद्र मोदी साहेब यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान करण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित सर्वांना केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा