You are currently viewing समाजभूषण कर्मयोगी डॉक्टर रा ना शेळके

समाजभूषण कर्मयोगी डॉक्टर रा ना शेळके

*समाजभूषण* कर्मयोगी डॉक्टर रा ना शेळ Drके*

अमरावती

खूप वेळा असं होत की, आपण दुसऱ्यांचे गुण पाहून प्रभावित होतो त्यांच्याबद्दल आपल्याला खूप कौतुक वाटते.पण अगदी जवळच्या व्यक्ती चे गुण आपल्या लक्ष्यातही येत नाहीत म्हणतात ना,
*अति परिचयात अवज्ञा*
माझंही तसंच झालं आहे
डॉ शेळके हे आमच्या दर्यापूर चे! त्यांचा, डॉक्टर म्हणून व एक चांगले मित्र म्हणून गेली पन्नास वर्षाचा परिचय आहे
विशिष्ट कामासाठी ते अमरावतीला येत असतात.
पण काही दिवसांपूर्वी मला भेटायला म्हणून ते मुद्दाम घरी आले. खूप आनंद झाला. काही जणांशी न बोलताही सुसंवाद करता येतो. भाषेची गरज नसते तसेच झाले माझे . थोडा वेळ थांबून सगळ्यांची विचारपूस करून डॉक्टर गेल्यानंतर त्यांचा दर्यापूरातील वैद्यकीय प्रवास
पुन्हा नव्याने आठवला.
डॉक्टरांचा जन्म अंजनगावचा! आजोबा व वडील शेतकरी! आई अतिशय प्रेमळ परंतु नशीबापुढे कोणाचे काही चालत नाही. डॉक्टर दोन वर्षाचे असतांना अचानक वडील हे जग सोडून गेले. आभाळ फाटले . आईने धीराने त्यांना लहानाचे मोठे केले एक मोठी व एक लहान अशा दोन बहिणी! आजोबा मुलाच्या मृत्यूने खचले असले तरी आपले दुःख मनात ठेवून आपल्या सुनेला धीर दिला . तिन्ही नातवंडाच्या सर्वांगीण विकासाकडे कटाक्षाने लक्ष दिले तिघेही समजदार ! डॉक्टर लहानपणापासून अतिशय हुशार ,नेटाने अभ्यास करणारे!
MBBS ची पदवी मिळाल्यावर
नोकरीमिळण्याआधीच सौ सुलभावहिनीच्या रूपाने गृहलक्ष्मीचा प्रवेश झाला! आणि लगेच त्यांना मलकापुरला शासकीय ग्रामीण रुग्णालयात नोकरी लागली. एकदीड वर्षानी बदली झाली म्हणून डॉक्टर दर्यापूरला आले. एक तरुण होतकरू हुशार डॉक्टर म्हणून परिसरात लोक त्यांना ओळखू लागले. त्यांच्या कौशल्यामुळे डिपार्टमेंट तर्फेMS करण्यासाठी त्यांना 1 वर्ष मुबंई व 2 वर्षासाठी नागपूरला पाठविले होते. डॉक्टरांनी दर्यापूरला सलग २२ वर्षे ग्रामीण रुग्णालयात सेवा दिल्यावर ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. कारण ह्या कालावधीत दर्यापूर; अंजनगाव ;अकोट या गावातील रुग्णांचे त्यांच्याशी भावनिक संबंध खूप घट्ट झाले होते.प्रत्येकाला आपल्या आजारात डॉक्टरच हवे असत.
दर्यापूरला त्यांनी खाजगी सेवा कधीचीच सुरू केली होती.
डॉक्टरांना आपला आजार सांगितला की आपण बरेच होणार हा सगळ्यांचा विश्वास व श्रद्धा! रुग्णाला आपल्याआजारा विषयी खूप काही सांगावे वाटे परंतु डॉक्टर अतिशय मितभाषी ! २० २२ तास काम करूनही त्यांना थकवा नसे. रुग्णाप्रति अतिशय कोमल भावना मनात असत! परिसरात शस्त्रक्रिया तज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता सर्व प्रकारच्या शस्त्र क्रिया ते सहज करीत.
१९९६ मध्ये चण्डिकापूर ला एका दिवसात १२० कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया केल्याचा त्यांचा विक्रम आहे..त्यांनी असंख्य महिला व पुरुषाच्या कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया केल्या आहेत अनेक सिझरीन केसेस त्यांनी यशस्वी केल्याअपेंडीक्स हर्निया ,अंधत्व निवारण ,नेत्र शस्त्रक्रिया यासाठी १९९४ चा राज्यशासनाचा पुरस्कार
तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या
हस्ते त्यांना देण्यात आला, त्यांची कुशाग्र बुद्धी झटपट निर्णय शक्ती व खंबीरपणे गुंतागुंतीची शस्त्रस्क्रिया करण्याची हातोटी सर्वश्रुत होती.वैद्यकीय क्षेत्रांत
होणारे नवनवीन बदल आत्मसात करण्याची त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे अतिशय निष्णात शल्यचिकित्सक म्हणून ते लोकप्रिय आहेत.तालुका
स्तरावर शस्त्रस्क्रिया त्यांच्याच मुळे उपलब्ध झाल्या गरीबविषयी अतिशय कळवळा असलेले डॉक्टर उत्तम धन्वंतरी आहेत तसेच ते निसर्ग प्रेमी सुद्धा आहेत सध्या ते अंजनगावला राहतात. त्यांचा शाकुंतल बंगला शेतात आहे चारी बाजूनी विविध फळझाडे आहेत गायी वासरे बैल आहेत ससे आणि बदक सुद्धा त्यांचे मित्र आहेत शेती हा त्यांचा आवडता विषय ! चांगले पीक येण्यासाठी त्यांचे सतत प्रयोग सुरू असतात लहान मुले त्यांना आवडतात त्यांच्याशी खेळतांना ते एका लहान मुलासारखे होतात मुलांनी आपली शैक्षणिक पात्रता वाढवावी चांगला अभ्यास करावा हे त्यांचे विचार!लहान मुलांच्या भवितव्याबद्दल काळजी असणारे डॉक्टर अंजनगावच्या श्री एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व उपाध्यक्ष आहेत माजी मंत्री श्री वसंतराव धोत्रे यांच्या आग्रहाने त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षपद स्वीकारले. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल केले. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळात त्यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वश्रुत आहे. समोरचा माणूस कितीही मोठा अधिकारी असला तरी आपले मत ते परखडप्रमाणे मांडतात. अघळपघळ बोलणे त्यांच्या स्वभावात नसल्याने त्यांचे व्यक्तिमत्व गूढ आहे असे वाटते!
त्यांच्या दोन मुली व एक मुलगा तिघेही उच्च पदावर आहेत लग्नाची ३० वर्षे सुखाचा संसार झाला वहिनींनी कधीही कुरकुर केली नाही. सगळे आनंदात असतांना पत्नीचे ब्लड कॅन्सरने निधन झाले. आणखी एक आघात ! त्यातूनही त्यांनी स्वतःला सावरले .आईवर त्यांचे विलक्षण प्रेम होते.ती माऊली होतीच तशी! दोन अडीच वर्षाच्या आपल्या लेकराला तिने प्राणपणाने जपले ,सुसंस्कृत बनवले त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर त्या आईच्या मायेने प्रेम करीत मलाही ते सौख्य मिळाले आहे डॉक्टरासाठी आई म्हणजे सबकुछ !आई म्हणजे सर्वस्व ! परंतु वयोमानानुसार त्याही हे जग सोडून गेल्या तेंव्हा डॉक्टरांना खूप एकटेपणा आला डॉक्टर तेंव्हाही शांतच राहिले. सबका मालिक एक यावर त्यांचा गाढ विश्वास आहे तो मालक जे करील ते बरोबर! आपण प्रभूंचे नोकर !
वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले डॉक्टर देववादी आहेत दैववादावर त्यांचा विश्वास नाही प्रत्येकाच्या जीवनात संघर्षाचे क्षण असतातच! सुख दुःख ,कटू प्रसंग अप्रिय घटना असतातच! जीवन म्हणजे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले महावस्त्र! डॉक्टरांच्याही जीवनात अनेक अप्रिय प्रसंग जिव्हारी लागणाऱ्या घटना घडल्याच असतील कारण साधे सरळ जीवन कोणाचेच नसते किंबुहना मी तर म्हणेन की सात्विक वृत्ती असलेल्याच्या जीवनात तर अप्रिय घटना असतातच! देव परीक्षा पाहत असतो ना! डॉक्टर ही या नियमाला अपवाद नाहीत.
त्यांच्या मनावर गीतेचा खुप प्रभाव आहे ते म्हणतात गीतेचे सार काय तर ठेवीले अनंते तैसेचि
रहावे काही वर्षांपूर्वी त्यांची एन्जोप्लास्टी झाली तरीही डॉक्टर लगेच रुग्ण सेवेसाठी हजर झाले काही दिवस आराम करा अस सुचवल्यावर ते म्हणाले झालं आता ते त्याचा कशाला विचार करावा?फार पूर्वी एकदा ते मला म्हणाले होते मनुष्याने जीवनाकडे कसे पाहावे तर *असं तर असं , तसं तर तसं शेवटी जसं असेल तसं* हा विचार मनात सतत ठेवावा, म्हणजे कशाचेच दुःख होत नाही दुसऱ्याला मदत म्हणून जे करता येईल ते करावे व विसरून जावे ह्या त्यांच्या स्वभावाचा मलाही अनेक वेळा अनुभव आला आहे त्यांची वैद्यकीय मदत तर प्रत्येकच वेळी झाली पण मानसिक मदतही खूप वेळा झाली आहे, अर्थात त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना त्यात काही विशेष वाटत नसेल
आपल्या कर्तृत्वाने श्रेष्ठ
ही व्यक्ती जीवनाबद्दल किती सहजतेने विचार करते ह्याचे मला खुप नवल वाटते
अगदी लहानपणी पितृछत्र हरवले ,संसार अर्ध्यावर सोडून पत्नी ची साथ सुटली वयानुसार आईही जग सोडून गेली जीवन बांधून ठेवणारे एकेक मणी निसटून गेले कोरोना काळात जवळच्या मित्रांना गमावले, मुले ही आपल्या विश्वात रमली ह्या सर्व घटनांकडे ते अतिशय स्थितप्रज्ञतेने पाहतात .मुलांचा खूप आग्रह असतो की, डॉक्टरांनी त्यांच्याजवळ राहावे परंतु डॉक्टर म्हणतात तिथे शहरात माझी ओळख काय असणार? इथे गावात माझी माणसे आहेत इथली हवा वातावरण ,निसर्ग सगळे माझे आहे मला इथे कधीच एकटेपणा वाटत नाही आपल्या एकटेपणात ते खुश आहेत त्यांची शेती गायी वासरे त्यांचे अंजनगाव , दर्यापुर त्यांना सोडावेसे वाटत नाही अजूनही ते गुरुवारी व रविवारी दर्यापूरला जातात जुने लोक भेटतात , वेळ चांगला जातो
अधिक काय हवे? जेजे होईल ते पहावे आनंदात रहावे
तो मालक( परमेश्वर) जसं ठेवेल
तसं राहावं अस नेहमी म्हणणाऱ्या डॉक्टरांना
कधीही फोन केला कसे आहात विचारलं तर ते मिस्कील हसतात. काहीच अडचण नाही सगळं छान आहे वयानुसार निसर्ग सूचना देतो आहे असं सहजपणे म्हणतात त्यांच्या स्वभावाचे एक खास वैशिष्ट्य माझ्या लक्ष्यात आले आहे की आयुष्यभर मनस्ताप देणारे अनेक प्रसंग येऊनही त्यांनी कधीही आपल्या दुःखाचे भांडवल केले नाही
त्यांच्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान म्हणजे…..
*असं तर असं तसं तर तसं अन शेवटी जसं असेल तस*

असलेल्या परिस्थितीत समाधान मानून घेणाऱ्या डॉक्टर साहेबांचा हा जीवनप्रवास आपण प्रेरणा घेण्यासारखाच आहे

प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा