You are currently viewing कुडाळ – कोतवाल भरतीला २८ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

कुडाळ – कोतवाल भरतीला २८ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

कुडाळ – कोतवाल भरतीला २८ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

कुडाळ

कुडाळ तालुक्यात होणाऱ्या कोतवाल भरतीला मुदतवाढ मिळाली असून सोमवार २८ ऑगस्ट पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात अशी माहिती कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली दरम्यान आज (शुक्रवार) पर्यंत सुमारे ३२५ कोतवाल भरती साठी अर्ज दाखल झाले आहे.

कुडाळ तालुक्यामध्ये रिक्त झालेल्या कोतवाल या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे त्यासाठी समांतर आरक्षणाची प्रक्रिया झाल्यानंतर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे अर्ज मागविण्याची शुक्रवार २५ ऑगस्ट ही शेवटची तारीख होती मात्र आता त्यामध्ये मुदतवाढ देऊन सोमवार २८ ऑगस्ट पर्यंत उमेदवार या भरतीसाठी अर्ज दाखल करू शकतात असे तहसीलदार अमोल फाटक यांनी सांगून आज (शुक्रवार) पर्यंत ३२५ एवढे अर्ज कुडाळ तहसील कार्यालयात दाखल झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =