गुरुंच्या हस्ते विद्यार्थ्यांचा शिक्षकदिनी सत्कार, लायन्स् चा स्तुत्य उपक्रम

गुरुंच्या हस्ते विद्यार्थ्यांचा शिक्षकदिनी सत्कार, लायन्स् चा स्तुत्य उपक्रम

गुरुंच्या हस्ते विद्यार्थ्यांचा शिक्षकदिनी सत्कार, लायन्स् चा स्तुत्य उपक्रम

कुडाळ / प्रतिनिधी :-

आज शिक्षक दिनी माझ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा योग लायन्स क्लबने घडवून आणला हे निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक का आ .सामंत यांनी आज डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून केले.

लायन्स क्लब ऑफ कुडाळ या सेवाभावी संस्थेच्या वतीने कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरविंद शिरसाट व आनंद वैद्य या गुणी माजी शिक्षकांचा आज शिक्षक दिनी गौरव सोहळा कुडाळ हायस्कूल येथे लायन्स क्लबचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी संस्था पदाधिकारी डॉ. अविनाश तळेकर सुरेश चव्हाण लायन्स क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष नयन भणगे सचिव सागर तेली विभागीय अध्यक्ष शोभा माने लायन्स पदाधिकारी अॅड. अजित भणगे, सीए सुनील सौदागर, अॅड. श्रीनिवास नाईक, स्नेहा नाईक, सुधा कुलकर्णी कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य राजकिशोर हावळ मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभुवालावलकर, उपमूख्याध्यापक मनोहर गुरबे, सीए शैलेश मुंडये आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना का. आ . सामंत म्हणाले लायन्स क्लब या सेवाभावी संस्थेने अनेक स्तुत्य उपक्रम राबवले आहेत. आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरविंद शिरसाट व आनंद वैद्य या दोन गुणी शिक्षकांचा, विशेष म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांचा सत्कार माझ्या हातून होतो हा लायन्स क्लब ने घडवून आणलेला क्षण प्रेरणा देणारा आहे, असे सांगितले.

डॉ अविनाश तळेकर म्हणाले आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक बांधिलकी जोपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लायन्स क्लबचे कार्य फार मोठे आहे. आमच्या शाळेच्या मुलांसाठी जनजागृतीचे विविध उपक्रम लायन्सने राबविले आहेत. यापुढेही असे उपक्रम राबवावेत, असे सांगितले.
सत्कार मूर्ती आनंद वैद्य म्हणाले सत्कारमूर्ती अरविंद शिरसाट यांच्या शैक्षणिक कार्याची दखल लायन्सने घेतली. खरं तर यापूर्वीच श्री शिरसाट यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळणे क्रमप्राप्त होते, एवढे त्यांचे कार्य मोठे होते. हा सत्कार आम्हाला प्रेरणा देणारा आहे, असे सांगितले. सत्कारमूर्तीना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक ॲड. अजित भणगे यांनी केले. आभार सीए सुनील सौदागर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा