You are currently viewing गिरोडा येथे बंगल्यात प्रवेश करून पाऊणे तीन लाखांचा ऐवज नेला चोरून दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गिरोडा येथे बंगल्यात प्रवेश करून पाऊणे तीन लाखांचा ऐवज नेला चोरून दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गिरोडा येथे बंगल्यात प्रवेश करून पाऊणे तीन लाखांचा ऐवज नेला चोरून दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दोडामार्ग

गोवा येथील रहिवासी लाॅरेन्स पाॅल डिसोजा याने दोडामार्ग गिरोडा येथे गोवा ग्रीन बंगला तसेच कार्यालय बांधले होते या ठिकाणी कुणी अज्ञात इसमाने गेट उघडून खिडकीतून बंगल्यात आॅफिस मध्ये प्रवेश करून जवळपास पाऊणे तीन लाखांचा ऐवज चोरून नेल आहे. दोडामार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती दोडामार्ग पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
दोडामार्ग पोलिस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार सदर चोरीची घटना १३ ते १४ मे दरम्यान घडली असावी डिसोजा बुधवारी घरी आले असता ही घटना उघडकीस आली. दोडामार्ग पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं 48/2024 भादवी कलम 380, 454, 457 प्रमाणे
गुन्हा दाखल केला आहे . बंगला मालक
.- लॉरेन्स पॉल डिसोजा, वय 45 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी राहणार कँडिडा बरेट्टो, घर नं200/5 किणी कॉलनी, मुलुर, कोर्लीम, ओल्ड गोवा राज्य गोवा यांनी फिर्याद दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा